solapur

वंचित बहुजन आघाडीतर्फे ख्रिसमस उत्साहात साजरा

वंचित बहुजन आघाडीच्या अक्कलकोट शहर व तालुक्याच्यावतीने ख्रिसमसचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. वंचित आघाडीचे महासचिव नागेश हरवाळकर यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हाध्यक्ष श्रीशैल गायकवाड, महासचिव अनिरूद्ध वाघमारे, उपाध्यक्ष रवी थोरात, शिलामणी बनसोडे यांच्या हस्ते गरीब महिलांना साड्यांचे तर लहान मुलांना फळांचे वाटप करण्यात आले.
येशू ख्रिस्तांनी मानवतेचा, प्रेमाचा संदेश दिला आहे. सर्वांनी त्यांच्या विचाराचे अनुकरण करावे, असे आवाहन हरवाळकर यांनी केले. युवकांनी सोशल मीडियाच्या आहारी न जाता सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवावा, असे आवाहन तालुकाध्यक्ष चंद्रशेखर मडिखांबे यांनी केले.
सध्या श्रीमंत व गरीब यांच्यातील दरी वाढत आहे. ही दरी कमी होण्यासाठी सर्वच घटकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी सतत अभ्यास करून यशाचे शिखर गाठून आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे, असे आवाहन हरवाळकर यांनी केले. नूतन ग्रामपंचायत सदस्यांनी गावच्या विकासाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. विकासकामे करून मतदारांचा विश्वास सार्थकी लावा, असेही ते म्हणाले.
याच कार्यक्रमात युवक आघाडीच्या नूतन पदाधिकार्‍यांचा व नूतन ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी हनुमान चौकातील ढाले वस्तीतील मोची समाजाचे कुलदैवत जांबमुनी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमास शहराध्यक्ष विशाल ठोंबरे, रवी पोटे, संयोजक नागेश हरवाळकर, विशाल ठोंबरे, भारत देढे, संजय शिंदे, श्याम बनसोडे, नरसिंह गायकवाड, राम हल्ले, प्रकाश शिंदे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button