top news

चीनमध्ये हाहाकार उडवणारा BF.7 सप्टेंबरमध्येच भारतात; पण…

कोरोनाची तीव्रता चीनमध्ये वाढत आहे. स्मशानात अंत्यसंस्कारासाठी आणि हॉस्पिटलमध्ये बेडसाठी वेटिंग आहे. कोरोनामुळे चीनमध्ये नव्या वर्षात किमान 10 लाख मृत्यू होतील, असा अंदाज आहे. भारतात सप्टेंबर 2022 मध्ये अमेरिकेतून गुजरातमधील बडोद्यात आलेल्या महिलेला BF.7 ची बाधा झाल्याचे आढळले होते. 

पण वेळीच खबरदारी घेतल्यामुळे भारतात त्यावेळी BF.7 पसरला नव्हता. संबंधित महिला आणि तिच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना वेळीच क्वारंटाइन करण्यात आले होते. यामुळे संकट टळले. मात्र आता चीनमध्ये BF.7 विषाणूचा संसर्ग पसरत आहे. भारत सरकारने चीनमधील परिस्थिती बघून देशांतर्गत खबरदारीचे उपाय करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
नागरिकांनी तब्येत बिघडल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा आणि डॉक्टरांकडे जाताना खबरदारीचा उपाय म्हणून मास्क वापरावा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधोपचार करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button