solapur
ब्रेकिंग! भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्या अंगावर शाई फेक
सोलापुरात भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या अंगावर आज शाई फेकण्यात आल्याचा माहिती मिळत आहे. सम्राट चौक परिसरातील न्यू बुधवार पेठ येथील बुद्धराष्ट्र प्रतिष्ठान यांच्यावतीने सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन सायंकाळी करण्यात आले होते.
त्या सोहळ्याला आमदार देशमुख हे प्रमुख पाहुणे होते. ते त्या ठिकाणी गेले असता एका भीमसैनिकाकडून आमदार देशमुख यांच्या अंगावर शाई फेकण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार त्या युवकाला जोडभावी पेठ पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले.
याप्रकरणी काही पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारले असता सार्वजनिक कार्यक्रमात असे होते, समाजाच्या मी भावना समजू शकतो. असे सांगून शाई फेक झाली असली तरी आमदार देशमुख हे शर्ट बदलून मोठ्या मनाने त्या कार्यक्रमाला तिथेच थांबले आहेत, अशी माहिती मिळाली.