Sunday, September 8, 2024
Homebusinessव्हॉट्सॲप येतेय दोन प्रकारे स्टेटस

व्हॉट्सॲप येतेय दोन प्रकारे स्टेटस

सध्या व्हाट्सअपवर दोन प्रकारे स्टेटस लावता येते. व्हिडिओ आणि टेक्स्ट असे दोन पर्याय स्टेटस अपडेटसाठी उपलब्ध आहेत. तुमच्या स्टेटसला तुम्ही कुठलाही व्हिडिओ लावू शकता किंवा मेसेज टाईप करू शकता. यासोबतच आता तुम्ही ऑडिओ फीचरही वापरू शकणार आहात. म्हणजेच तुम्ही तुमचा केवळ आवाज रेकॉर्ड करून तो स्टेटस म्हणून ठेवू शकाल. व्हाट्सअपमधील हा एक मोठा आणि क्रांतिकारी बदल असल्याची चर्चा सुरू आहे.
व्हाट्सअप स्टेटससाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या ऑडिओची वेळ ही 30 सेकंद असणार आहे. तुम्ही तुमच्या ओरिजिनल आवाजात स्टेटस अपडेट करू शकता आणि ते अपलोड करू शकता. इतरांना तुमच्या आवाजातील हे स्टेटस थेट ऐकू येऊ शकेल.
सध्या टेस्टिंग मोडवर हे फिचर उपलब्ध करून देण्यात आले आहे. याचाच अर्थ काही ठराविक युजर्स ते वापरत असून त्यांच्या अनुभवावर आधारित चुका दुरुस्त करून मग ते फीचर सर्वसामान्य ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येईल. एखादे फीचर सर्वसामान्य ग्राहकांना उपलब्ध करून देण्यापूर्वी ते टेस्टिंग मोडवर टाकले जाते. जगभरातील विविध देशांमधील काही नंबर हे टेस्टिंग मोडसाठी निवडण्यात आलेले असतात.
या गटातील युजर्स अगोदर हे फिचर वापरतात आणि त्याविषयी आपला फीडबॅक देतात. त्या फीडबॅकच्या आधारे त्या ठराविक फीचरमध्ये अधिक सुधारणा केल्या जातात आणि पुन्हा एकदा ते फीचर टेस्टिंग मोडवर टाकले जाते. मग दुसऱ्यांदा हेच विचार वापरल्यानंतर पुन्हा सूचना आणि हरकती मागवण्यात येतात. या सूचनांच्या आधारे पुन्हा काही बदल या फिचरमध्ये केले जातात.
अशाप्रकारे दोन वेळा बदल करण्यात आलेले हे फीचर सर्वसामान्य वापरकर्त्यांना दिले जाते. त्यामुळे अधिकाधिक अचूक फीचर वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होते. सध्या टेस्टिंग मोडवर असलेले हे फीचर वापरकर्त्यांना लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments