top news
पाणी द्या नाही तर थेट कर्नाटकात जाऊ
सीमावाद न्यायालयात प्रलंबित असताना आता ४० गावांचा प्रश्न नव्याने निर्माण झाला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील ४० गावांनी कर्नाटकात सामील होण्याचा ठराव मंजूर केला आहे व या प्रस्तावावर कर्नाटक सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचे म्हटले होते.
त्यानंतर महाराष्ट्रातील सत्ताधारी व विरोधक आक्रमक झाले आहेत. सांगली जिल्ह्यातील दुष्काळी जत तालुक्यातील ४० गावांनी महाराष्ट्र सरकारला अल्टिमेटम देत थेट कर्नाटकमध्ये विलीन होण्याचा इशारा दिला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर जत तालुका पाणी कृती समितीने महाराष्ट्र सरकारला इशारा दिला आहे.
महाराष्ट्र सरकारला शेवटची संधी आहे, पाणी द्या नाही तर आम्ही कर्नाटकमध्ये जाऊ, असा अल्टिमेटम जत तालुका पाणी कृती समितीने दिला आहे.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्र मधील सत्ताधारी आणि विरोधकांना जाग आली आहे. इतके दिवस पाणी आणि अन्य सुविधा जत तालुक्याला का दिल्या नाहीत? असा सवाल समितीकडून करण्यात आला आहे.
महाराष्ट्र सरकारला शेवटची संधी आहे, पाणी द्या नाही तर आम्ही एनओसीची वाट बघणार नाही, थेट कर्नाटकात जाऊ, असा इशारा समितीचे अध्यक्ष सुनील पोतदार यांनी दिला आहे. याबाबत आज शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता उमदीमध्ये ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.