Sunday, September 8, 2024
Homesportsसतरा चेंडूत फिफ्टी ; सूर्याने मोडला युवराज सिंहचा रेकॉर्ड

सतरा चेंडूत फिफ्टी ; सूर्याने मोडला युवराज सिंहचा रेकॉर्ड

टी ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर सध्या भारत न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत तीन t 20 सामने खेळणार आहे. यातील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला तर रविवारी दुसऱ्या सामना खेळला गेला. टॉस जिंकून न्युझीलंडने भारताला प्रथम फलंदाजी दिली. टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये जबरदस्त कामगिरी करणारा सूर्या आजही चमकला. सूर्यकुमार यादवने या सामन्यात शतक झळकावले. अगदी पहिल्या चेंडूपासून त्याने आक्रमक पवित्रा घेतला.
त्याने मैदानात चौकार, षटकारांची आता आतिशबाजी केली. सूर्याने केवळ 49 चेंडूंमध्ये 111 धावांची नाबाद खेळी केली. त्यामुळे भारताने वीस षटकात 191 धावा काढल्या. सूर्याने आपल्या शतकी खेळीत 11 चौकार तर सात षटकार ठोकले. त्याने न्यूझीलंडच्या गोलंदाजांना अक्षरशः झोडपून काढले. सूर्याने तंत्रशुद्ध फलंदाजीचे समीकरण बदलून टाकले आहे.

सूर्या सध्या भारतीय क्रिकेट संघातील महत्त्वाचा खेळाडू बनला आहे.  192 धावांचे आव्हान न्यूझीलंडला पेलले नाही. भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली. अखेर या सामन्यात भारताने 65 धावांनी हा विजय मिळवला. या सामन्यात सूर्याने आणखी एका विक्रमाची नोंद केली. टी ट्वेंटी मध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम युवराज सिंहच्या नावावर होता. T20 मध्ये 74 षटकार ठोकले होते.
आज सूर्याने सुमारे सात षटकार ठोकून हा विक्रम मोडीत काढला. सूर्याने t 20 मध्ये आतापर्यंत 79 षटकार ठोकले आहेत. आजच्या सामन्यात सूर्याने पहिली फिफ्टी 32 चेंडूंमध्ये तर पुढची फिफ्टी केवळ 17 चेंडूमध्ये पूर्ण केली. 
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments