भारतात एकेकाळी कायनेटिक लुनाची जबरदस्त क्रेझ होती. या गाड्यांची भारतात जबरदस्त विक्री झाली. ही कंपनी साधारणपणे 1972 च्या दरम्यान टॉपवर होती. चल मेरी लुना हे स्लोगन चांगलेच गाजले होते. मध्यंतरी या कंपनीचा बोलबाला कमी झाला.
तसेच गाड्यांची विक्री कमी झाली. मात्र पुन्हा एकदा या गाडीची दमदार एन्ट्री होत आहे. सर्वांच्या आवडीची ही गाडी आता इलेक्ट्रिक रूपात येणार आहे. कंपनीने नुकतीच याची माहिती दिली आहे. यामुळे लुना प्रेमींमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. सध्या या गाडीच्या चेसिस व इतर पार्टच्या उत्पादनाचे काम सुरू आहे. याचे उत्पादन अहमदनगर जिल्ह्यात केले जात आहे. कायनेटिक ग्रुपने 1972 मध्ये लुना लॉन्च केली होती. या लुनाला जबरदस्त डिमांड असायची.
2000 मध्ये या कंपनीने याचे उत्पादन बंद केले होते. मात्र आता सर्वांच्या आवडीची ही गाडी भारतातील रस्त्यावर धावताना दिसेल. काळाची गरज ओळखून ही गाडी आता इलेक्ट्रिक अवतारात दिसेल. इलेक्ट्रिक लुना कुठल्या रंगात उपलब्ध असेल, याची माहिती मिळू शकली नाही.
संबंधित बातम्या
हिवाळ्यात कोणती फळे खाऊ नयेत? जाणून घ्या अन्यथा वारंवार आजारी पडाल
सचिनचा सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडण्यासाठी जो रूटला आणखी किती शतके हवी आहेत?
RBI Repo Rate: आनंदाची बातमी! रिझर्व्ह बँकेने रेपो रेट घटवला, गृहकर्जाचा EMI कमी होणार
मोबाईल चार्जरवर दिलेल्या ‘या’ अंकांचा नेमका अर्थ काय, तुम्ही वापरत असलेला चार्जर खरंच सुरक्षित आहे का?
तुम्हाला सुद्धा डोक्यावर चादर घेऊन झोपायची सवय आहे? आत्ताच ही सवय बदला नाहीतर…




