टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्था निवडणूक ; समविचारी पॅनलला अभूतपूर्व प्रतिसाद

Follow Us:
सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित बाळे या पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्वाधिक मतदान असणारा तालुका म्हणजे बार्शी. या तालुक्यामध्ये 368 मतदान आहे.
कृती समितीच्या पॅनल प्रमुख दत्ता सावंत यांनी संपूर्ण जिल्हाभर बार्शी तालुक्यातून एकही उमेदवार आमच्या विरोधात नाही संपूर्ण बार्शी तालुका आमचाच आहे. अशा प्रकारची माहिती देऊन सभासदांची दिशाभूल केली होती.
समविचारी स्वाभिमानी पॅनलच्या पाठीमागे असणाऱ्या बुजुर्ग मंडळींनी व सर्व उमेदवारांनी आज अत्यंत काटेकोर नियोजन करून बार्शी तालुक्यातील प्रत्येक शाळेपर्यंत आपला उमेदवार व प्रचार साहित्य पोहोचवण्याचे दांडगे नियोजन करून यशस्वी केली आहे.
उमेदवार ज्या शाळेमध्ये जात होते. त्या शाळेमध्ये गेल्या सात वर्षांमधील सभासदांना भोगावे लागलेली हाल व पतसंस्थेची होत चाललेली अधोगती यावर स्वतः सभासद व्यथा मांडत होते.आपली पतसंस्था नष्ट करण्यासाठी निघालेल्या भ्रष्ट राजकीय व्यक्ती पासून वाचवण्यासाठी आम्ही समविचारी पॅनल बरोबर आहोत. अशी ग्वाही देत होते. अनेक शाळेमधून समविचारी पॅनलच्या उमेदवारांचे स्वागत करण्यात आले.
या प्रचारामध्ये पतसंस्थेच्या भ्रष्टाचाराबद्दल  अत्यंत महत्त्वाचे पुरावे बाहेर काढणारे. समविचारी स्वाभिमानी पॅनलचे उमेदवार नानासाहेब मारकड यांनी पतसंस्थेतून नूतन संचालिका म्हणून निवड झालेल्या भगिनी सुप्रिया विलास पांगळ यांच्या प्रशालेत जाऊन त्यांचे अभिनंदन केले.
बार्शी तालुक्यातून कृती समितीत पडलेली उभी फुट हाच बार्शी तालुक्याला मतदानात कलाटणी देणारा भाग असून तो समविचारी स्वाभिमानी पॅनलच्या बाजूने झुकताना दिसतो. बार्शी तालुक्यातील उत्तम प्रतिसादामुळे समविचारी स्वाभिमानी पॅनलचा विजयाचा मार्ग दिसून येतो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Solapur News: पोहायला गेलेल्या भाऊ-बहिणीवर काळाचा घाला, शेततळ्यात बुडून गमावला जीव, सोलापुरात घडली हृदयद्रावक घटना

मोठी बातमी : 8 जणांचा जागीच मृत्यू, कल्याण- नगर महामार्गावर भीषण अपघात!

Iran US War Ceasefire – मोठी बातमी: अखेर युद्ध थांबलं! अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

Solapur Airport ‘मोठी अपडेट’! 17 एप्रिलपासून हैदराबाद फ्लाइट सुरू; गोवा फ्लाइट वेळेत मोठा बदल

पंढरपूर : पहाटे काही सेकंदात होत्याचे नव्हते झाले… खळबळ उडवणारी घटना, थेट कालव्यातच..

Horoscope Today 4th April March 2026 : शनिवारचा दिवस ठरणार खास, या लोकांना प्रवासातून करिअरसाठी मोठी संधी, वाचा आजचं भविष्य