टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

शिंदेंनी भाजपची साथ सोडली तर युतीबाबत विचार करू

Follow Us:

काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आमचा खिमा केला आहे. भाजपसोबत गेलो असतो तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा खिमा केला असता, पण आम्ही तसे केले नाही. माझी आणि माझ्या पक्षाची ताकद मला माहीत आहे. काँग्रेस आणि शरद पवारांना मी चांगला ओळखतो, सेनेसोबत समझोता करण्यासाठी मी तयार आहे, एकत्र लढण्याबाबत ठाकरेंकडून जाहीर करणं बाकी आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

आंबेडकर यांनी मुंबईतील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात आज पत्रकार परिषद घेतली आहे, त्यावेळी ते बोलत होते. आमची सेनेसोबत जाण्याची भूमिका सेनेने जाहीर करायची आहे. जाहीरपणे कधी सांगायचे हे सेनेने ठरवावे. चार भिंतीत एकत्र जायचे हे आमचे ठरले आहेत. सेना आमच्यासोबत येणार असल्याचं त्यांनी म्हटलंय, काँग्रेस-एनसीपी आमच्या सोबत येणार नाही हे मला माहीत आहे. 
शिवसेनेनी आता आमची युती कधी होणार हे जाहीर करण्याबाबत ठरवले पाहिजे, असेही आंबेडकर म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाजपची साथ सोडल्यास आम्ही त्यांच्यासोबत युतीचा विचार करू, असेही आंबेडकर म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा | 13 एप्रिल 2026 | सोमवार

इराणसोबत चर्चा फेल होताच पाकिस्तानने उचललं मोठं पाऊल, 13 हजार सैनिक सौदी अरेबियात दाखल

Hardik Pandya vs Krunal Pandya : पंड्या ब्रदर्समधली फूट चव्हाट्यावर ? ना हँडशेक, आऊट झाल्यावर आक्रमक सेलिब्रेशन

South Cinema Actor Harish Died: सिनेसृष्टी हादरली; टँकरला कारची जोरदार धडक, भीषण रस्ते अपघातात 40 वर्षांच्या सुप्रसिद्ध अभिनेत्यावर काळाचा घाला

Pandharpur Crime News: पंढरपूर ॲसिड हल्ला प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट! तरुणीनेच रचला स्वतःवर हल्ल्याचा बनाव; पोलिसांनी असा उघड केला बनाव

मोठी बातमी ! होर्मुज स्ट्रेटमध्ये आजपासून नाकाबंदी, ट्रम्प यांच्या निर्णयाने भारताला बसणार फटका