आंध्रप्रदेश राज्यातील नेल्लोर जिल्ह्यातील कंडुकुरमध्ये तेलुगू देशम पार्टीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्या एका सभेत चेंगराचेंगरी झाल्याने ८ लोकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत अनेक लोक जखमी झाले आहेत. जखमींनी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सभेवेळी गोंधळ कसा झाला व चेंगराचेंगरी कशी झाली, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. चंद्राबाबू राज्य विधानसभा विरोधी पक्षनेते आहेत. ते काल कंडुकुर शहरात एका सभेला संबोधित करणार होते. त्यांचा ताफा जात असताना गर्दी उसळली व चेंगराचेंगरी झाली. मोठी गर्दी झाल्यावर काही लोक रस्त्या लगतच्या नाल्यात पडले, तर काही लोक बेशुद्ध पडले. नायडूंना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक जमले होते.
सम्बंधित ख़बरें

Maharashtra MBBS Admissions 2025: दुसऱ्या फेरीसाठी नवीन वेळापत्रक जाहीर; तिसरी फेरी कधीपासून सुरू होणार?

दहावी-बारावी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; ‘हा’ नियम नाही पाळला तर बोर्डाच्या परीक्षेसाठी ठराल अपात्र, संपूर्ण वर्ष वाया जाईल

Gemini चा स्वस्त प्लॅन लॉन्च, ChatGPT Go पेक्षा खास? जाणून घ्या

उद्धव ठाकरेंचा दिल्लीत, शरद पवारांच्या घरी सहकुटुंब भेट; राहुल गांधींकडे स्नेहभोजनाचे निमंत्रण

Accident News: रस्त्यावर व्यायाम करताना भरधाव ट्रकनं 6 मुलांना चिरडलं; चौघांचा मृत्यू, भयावह घटना