महेश कोठे-चेतन नरोटे यांची धर्मराज काडादी यांना थेट ऑफर

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter
बोरामणी विमानतळ सुरू करा, सिद्धेश्वर साखर कारखान्यांची चिमणी वाचवा या मागणीसाठी कारखान्याचे मार्गदर्शक धर्मराज काडादी यांच्या नेतृत्वाखाली आज हजारों शेतकऱ्यांचा विराट मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चाचे पुढे होम मैदानावर भव्य सभेत रूपांतर झाले. यावेळी माजी महापौर महेश कोठे यांनी मुद्देसूद भाषण केले तर काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी जोरदार भाषण केले.
कोठे म्हणाले, एनटीपीसी 300 मीटर चिमणी झाली, तेव्हा सरकार काँग्रेसचे होते शिंदे यांनी मंजुरी आणली, नंतर सरकार बदलले 90 मीटरच्या चिमणीला मंजुरी मिळत नाही, खरे राजकारण तिथून सुरू झाले, 2000 सालचा सर्व्हे रिपोर्ट आहे, ट्रॅक नंबर 33 चा अडथळा येतो, ट्रॅक नंबर 15 वर कोणताही अडथळा नाही, विमान येतात आणि जातात ट्रॅक 33 सुरू करायचा असेल तर केवळ चिमणी पडून चालणार नाही तर सर्व हाय टेन्शन इलेक्ट्रिक वायर काढले पाहिजेत असे सांगतानाच तुम्ही मैदानात उतरा, असे आवाहन केले.
  1. नरोटे म्हणाले, होटगी रोड विमानतळ सुशीलकुमार शिंदे यांनी आणले. बोरामणी विमानतळ सुद्धा त्यांनीच आणत 150 कोटी रुपये दिले. अजित पवारांच्या माध्यमातून आमदार प्रणिती शिंदे यांनी बोरामणी विमानतळ साठी 50 कोटी आणले. भाजपने मागील 10 वर्षात एक वीट तरी बसवली का? जाणीवपूर्वक काडादी यांना त्रास दिला जातोय. काडादी हे शांत स्वभावाचे आहेत पण तुम्ही बाहेर येत नाही, तुम्ही एकदा बाहेर या, असे त्यांनी आवाहन केले. नरोटे व कोठे यांनी हे आवाहन करताच उपस्थितांमधून टाळ्यांचा कडकडाट झाला.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon