टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न फसला…

Follow Us:

अलीकडे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, मुंबईतील बोरिवली स्थानकावर सुरू झालेली लोकल ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करताना पडल्याने एका शिक्षिकेचा मृत्यू झाला आहे. प्रगती घरत (४३) असे  या शिक्षिकेचे नाव आहे.

प्रगती या मालाड येथील एका शाळेत शिक्षिका होत्या. त्या वसईत राहत होत्या. त्या दररोज बोरिवलीत ट्रेन बदलायच्या. सकाळी नेहमीप्रमाणे त्या बोरिवली स्थानकावर उतरल्या. प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून सुटणाऱ्या चर्चगेट ट्रेनच्या सेकंड क्लासच्या डब्यात चढण्याचा प्रयत्न त्या करत होत्या. मात्र, ट्रेन नुकतीच सुरू झाली होती. 

ती पकडण्याच्या नादात त्यांचा पाय घसरला आणि त्या प्लॅटफॉम व ट्रेनच्या मधील मोकळ्या जागेत अडकल्या. यात त्यांना गंभीर दुखापत झाली. पोलिसांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करून त्यांच्या नातेवाईकांना ही माहिती दिली. त्यानंतर प्रगती यांना अंधेरीतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

जंगल परिसरात कोसळलेल्या कोलंबियन लष्करी C-130 विमानाचे अवशेष

कोलंबियात भीषण विमान दुर्घटना: 110 जवानांसह C-130 कोसळले; 66 हून अधिक मृत, बचावकार्य सुरू

इराण-इस्रायल युद्ध थांबणार? 9 एप्रिलला अमेरिकेची मोठी भूमिका; इस्रायली अधिकाऱ्यांचा दावा

Colombia Plane Crash: कोलंबियात मोठी दुर्घटना, 110 जवानांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान उड्डाण घेताच तीन किलोमीटरवर क्रॅश   

सातारा पोलिस अधीक्षकांचे निलंबन करा; उपसभापती निलम गोऱ्हेंकडून निर्देश; सातारा झेडपी राड्याची गंभीर दखल

Parbhani Accident : स्विफ्ट कारला भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चौघांचा भयंकर अंत, बहीण-भावाची भेट अधुरीच!

Gold And Silver Price: सोने-चांदीची स्वस्ताईची गुढी! गुढीपाडव्याला किंमती इतक्या झाल्या कमी, ग्राहकांचा आनंद गगनात मावेना