टी 20 विश्वचषकात भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा सामना खेळला गेला. आफ्रिकेच्या विजयानंतर ब गटातील उपांत्य फेरीची समीकरणे बदललेली दिसून आली. या विजयानंतर आफ्रिका संघाने 3 सामन्यात 2 विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. त्यांचे 5 गुण झाले आहेत. त्यांचा नेट रनरेट 2.772 इतका आहे.
या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी भारतीय संघ असून त्यांचे 4 गुण आणि नेट रनरेट 0.844 असा असून, गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र होतील. नेदरलँड्स आपले पहिले तीनही सामने गमावून स्पर्धेतून जवळपास बाहेर झाला आहे.
तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या बांगलादेशने तीन सामन्यात दोन विजय संपादन करत स्वतःला अजूनही उपांत्य फेरीच्या शर्यतीत राखले आहे. मात्र, त्यांचा रनरेट -1.533 असा खराब दिसतोय. पाकिस्तानने तीन सामन्यात एक विजय मिळवला असला तरी त्यांचे पुढील सामने दक्षिण आफ्रिका व बांगलादेश यांच्याविरुद्ध होतील.
अशीच परिस्थिती असलेल्या झिम्बाब्वेला अखेरच्या दोन सामन्यात नेदरलँड्स व बलाढ्य भारताचे आव्हान असेल. या दोन सामन्यात मोठे विजय मिळवून, भारताच्या पराभवांची प्रार्थना पाकिस्तान संघाला करावी लागेल. भारतीय संघ आपले अखेरचे दोन सामने तुलनेने दुबळ्या असणाऱ्या बांगलादेश व झिम्बाब्वे यांच्याशी खेळेल.
संबंधित बातम्या
जेष्ठ सहकारी इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील दिशा ठरवणार ; दिपकआबा
मोठी बातमी: शिंदे अन् ठाकरेंची शिवसेना एकत्र येण्याची शक्यता; राजकारणात एकच खळबळ
Jio Airtel की Vi: कोणती कंपनी देतेयं दररोज 2 जीबी डेटा असलेला स्वस्त रिचार्ज प्लॅन? जाणून घ्या
दररोज 2 वेलची खाल्ल्यामुळे शरीरात दिसून येतील ‘हे’ बदल….
26 नोव्हेंबरला लाँच होणाऱ्या iQOO 15 स्मार्टफोनवर मिळणार हे नवे फीचर




