ऐन दिवाळीत पाकिस्तानला दणका : झिम्बाब्वेने एका धावेने उडवला धुव्वा

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter
T20 विश्वचषकमध्ये पाकिस्तानचा सलग दुसरा पराभव झाला आहे. आज पर्थमध्ये झालेल्या रोमहर्षक सामन्यात दुबळ्या झिम्बाब्वेने पाकिस्तानचा एका धावेने पराभव केला आहे. पाकिस्तानला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर ३ धावांची गरज होती, पण शाहीन आफ्रिदीला केवळ एकच धाव करता आली आणि पाकिस्तानला सामना गमावला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वे संघाने ८ गड्यांच्या मोबदल्यात १३० धावा केल्या.
झिम्बाब्वेकडून सीन विल्यम्सने सर्वाधिक ३१ धावा केल्या. कर्णधार इर्विन आणि ब्रॅड इव्हान्स यांनी १९-१९ धावांची खेळी केली.
फिरकी गोलंदाज शादाब खानने पाकिस्तानसाठी शानदार कामगिरी करत तीन विकेट घेतल्या. त्याचवेळी मोहम्मद वसीम ज्युनियरने चार विकेट घेतल्या. हरिस रौफला एक विकेट मिळाली.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon