ऐन दिवाळीत खुशखबर! पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter
  • जम्मू आणि काश्मीर तसेच लडाखमध्ये अनुच्छेद 370 हटविल्यापासून या प्रदेशांमध्ये विकासाची अनेक कामे जोमाने सुरू आहेत. पाकव्याप्त काश्मीर हा मुद्दा सुद्धा मागील अनेक वर्षांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. अशातच 1994 सालात भारतीय संसदेने पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर पाकिस्तानातून पुन्हा भारतात घेण्यासंदर्भात ठराव मंजूर केला होता.
पण तो अद्याप प्रत्यक्षात उतरलेला नाही. याच संदर्भात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू – काश्मीरमध्ये शौर्यदिनाचे औचित्य साधत एक वक्तव्य केले आहे. पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर लवकरच भारतात येईल, असे राजनाथ म्हणाले.
पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे दुःख आम्ही समजू शकतो. पाकिस्तानकडून त्यांच्या सर्व हक्काचं उल्लंघन करण्यात येत आहे. जम्मू आणि काश्मीर व लडाख विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहेत आणि ही केवळ सुरुवात आहे. सोबतच पाकव्याप्त काश्मीर, गिलगिट-बाल्टिस्तान भारतात समाविष्ट होईल आणि तो दिवस फार दूर नाही, असे राजनाथ म्हणाले.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon