Sunday, September 8, 2024
Homeindia world५३ प्रवासी भारतात आले कोरोनाला घेऊन

५३ प्रवासी भारतात आले कोरोनाला घेऊन

गेल्या महिन्यात चीनमधील कोरोनाबाधितांची आकडेवारी झपाट्याने वाढली. त्यामुळे चीनमध्ये लॉकडाऊनही करण्यात आला. लॉकडाऊन विरोधात तेथील जनता रस्त्यावर उतरली होती. मात्र चीन सरकारने लॉकडाऊनचा निर्णय कायम ठेवला. त्यानंतर चीनसह दक्षिण कोरिया, ब्राझील आणि अमेरिका येथील संसर्गाचे प्रमाणही वाढले. त्यामुळे भारतात केंद्र सरकारने खबरदारीच्या उपायांची अंमलबजावणी सुरु केली. परदेशातून विमानाने येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावरच चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
परदेशातून येणाऱ्या नागरिकांची विमानतळावर चाचणी सुरु झाली. त्यात ५३ प्रवासी पाॅझिटिव्ह आढळले आहेत. परदेशातील प्रवासी बाधित असल्याचे आढळल्याने घाबरण्याचे कारण नाही. मात्र नागरिकांनी काळजी घ्यायला हवी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा सबव्हेरियंट BF.7 चीनमध्ये आढळला आहे.

त्यामुळे चीन, हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंड येथून येणाऱ्या प्रवाशांना १ जानेवारी २०२३ पासून कोरोना चाचणीचा अहवाल बंधनकारक करण्यात आला आहे. भारतात येणाऱ्या प्रवाशांनी प्रवास सुरु करण्यापूर्वी ७२ तास आधी चाचणी करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच विमानतळावरही प्रवाशांची चाचणी करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments