भाजप नेत्या साध्वी प्रज्ञा यांनी पुन्हा एकदा मोठे विधान केले आहे. हिंदूंनी आपल्या घरात शस्त्रे ठेवावी, असा सल्ला त्यांनी दिला आहे. कर्नाटकातील शिवमोग्गा येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
हिंदूंना त्यांच्यावर आणि त्यांच्या प्रतिष्ठेवर हल्ला करणाऱ्यांना उत्तर देण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आपल्या घरात शस्त्रे ठेवा.
दुसरे काही नाही तर कमीत कमी भाजी कापण्यासाठी चाकू वापरा. कधी काय परिस्थिती येईल माहित नाही. प्रत्येकाला स्वसंरक्षणाचा अधिकार आहे. जर कोणी आमच्या घरात घुसून हल्ला केला तर त्याला चोख प्रत्युत्तर देणे हा आमचा अधिकार आहे, असे साध्वी यांनी सांगितले.