३ जानेवारीपासून श्रीलंकेविरुद्ध सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. बीसीसीआयने टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी संघाची घोषणा केली. टी-20 मालिकेतून वरिष्ठांना विश्रांती मिळाली आहे.
हा संघ निवडताना धक्कादायक निर्णय घेण्यात आले आहेत. वनडेच्या उपकर्णधारपदावरून के.एल. राहुलला हटवण्यात आले आहे. वनडे आणि टी-20 दोन्ही संघात ऋषभ पंतला स्थान मिळालेले नाही.
दुसरीकडे, सूर्यकुमार यादवला टी-20 संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. के.एल. राहुल संघातील जागा टिकवण्यात यशस्वी ठरला आहे. मात्र, त्याचे वनडेचे उपकर्णधारपद गेले आहे. त्याच्या जागी हार्दिक पांड्याला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. केएलची गेल्या वर्षभरातील कामगिरी पाहता त्याचे हे डिमोशन आहे.