यंदाच्या वर्षी अनेक अभिनेत्रींनी जगाचा निरोप घेतला. काही प्रसिद्ध चेहऱ्यांनी आत्महत्या करून अत्यंत कमी वयात जीवन संपवले. त्यातच आणखी एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीची भररस्त्यात गोळी घालून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
ही अभिनेत्री झारखंडची असून तिचे नाव रियाकुमारी उर्फ इशा आलिया असे आहे. तिची पश्चिम बंगालमधील हावडा येथे हत्या करण्यात आली आहे. आज सकाळी रांची ते कोलकत्ता महामार्गावर ही घटना घडली.
रिया ही तिचा पती प्रकाशकुमार आणि तीन वर्षांच्या मुलीसह कोलकत्याकडे निघाली होती. रस्त्यावरील दरोडेखोरांनी तिची हत्या केल्याची माहिती प्रकाशकुमार यांनी पत्रकारांना दिली. दरोडेखोरांना रियाने प्रखर विरोध केला याचाच राग मनात धरून दरोडेखोरांनी तिच्यावर गोळीबारच केला. यामध्ये रिया जागीच मृत्युमुखी पडली आहे.