शेळगी येथील श्री समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने विरंगुळा केंद्राची सुरुवात करण्यात आली. आ.विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेवक किरण देशमुख, अविनाश पाटील, नारायण बनसोडे, कल्पना कारभारी, राजश्री कणके, निर्मला तांबे,भाजपा अध्यक्ष विक्रम देशमुख, महादेव पाटील, महादेव कोगनूर, सुरेश हत्ती आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्ष रामचंद्र तपसाळे, चंद्रकांत रमणशेट्टी, बाबुराव नरुणे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक खानापुरे यांनी केले तर सुरेश तानवडे यांनी आभार मानले. यावेळी मन्मथ कोनापुरे, शिवलिंग शहाबादे यांच्यासह शेळगी परिसरातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.