शिवसेनेचं मिशन टायगर तुतारीच्या दिशेने? शरद पवारांच्या आमदाराकडे शिवसेना मंत्र्यांचे भोजन, म्हणाले, ताकद देऊ…

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

सोलापूर : राज्यात विधानसभा निवडणुकानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यातच, शिवसेना (Shivsena) शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगर सुरू झालं असून काही माजी आमदार-खासदारांचा शिवसेनेत प्रवेश होणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी म्हटले होते. त्यानंतर, ठाकरे गटाला धक्का देत माजी आमदार राजन साळवी यांचा शिवसेनेत प्रवेश झाला. तसेच, अनेक नगरसेवक व मुंबईतील काही पदाधिकाऱ्यांनीही एकनाथ शिंदेंचं नेतृत्व स्वीकारलं आहे. दुसरीकडे मंत्री भरत गोगावले यांचा सोलापूर दौरा आज राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. कारण, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू खरे ह्यांच्या बॅनरवर तुतारी चिन्ह नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यातच, मंत्री भरत गोगावले (Bharat gogawale) यांनी आज दुपारचे जेवण मोहोळचे आमदार राजू खरे यांच्या फॉर्म हाऊसवर केले. त्यामुळे, खरे यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू खरे यांनी पंढरपुरात केलेली बॅनरबाजी चर्चेत आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांच्या स्वागताचे बॅनर आमदार राजू खरे यांनी पंढरपुरात लावले आहेत. मात्र, या बॅनरवर कुठेही तुतारी चिन्ह नसल्याने व शिवसेनेच्या मंत्र्‍यांचं स्वागत विरोधात असलेल्या राष्ट्रवादीकडून होत असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले. त्यातच, मंत्री गोगावले यांनी आज राजू खरे यांच्या फॉर्म हाऊसवर दुपारचे जेवण केले. तर, राजू खरे यांना ताकद देऊ असेही ते म्हणाले. त्यामुळे, पन्हा ह्या चर्चा रंगल्या आहेत.

मोहोळ येथील शरद पवार गटाचे आमदार राजू खरे यांना त्यांच्या मतदारसंघात विकासासाठी सर्वतोपरी ताकद देणार असल्याचे मंत्री भरत गोगावले यांनी म्हटले. त्यामुळे, पुन्हा ऑपरेशन टायगर आता तुतारीकडे वळणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मोहोळमधील शरद पवार गटाचे आमदार राजू खरे हे स्वतःला कट्टर शिवसैनिक म्हणून घेतात, अशी वक्तव्यही त्यांनी अनेकवेळेला जाहीरपणे केली आहेत. भरत गोगावले यांचा आज पंढरपूर दौरा असताना आमदार खरे यांनी पंढरपूर आणि मोहोळ या दोन ठिकाणी केलेल्या बॅनरबाजीमध्ये शरद पवार आणि तुतारीला फाटा मारत एकनाथ शिंदे व भरत शेठ गोगावले यांचे फोटो वापरले होते. भरत गोगावले यांच्या स्वागतालाही आमदार खरे पहिल्यापासून उपस्थित होते. तेवढेच नाही तर गोगावले यांनी दुपारचे जेवणही राजू खरे यांच्या गोपाळपूर येथील फार्म हाऊसवर केले. याबाबत भरत गोगावले यांना विचारले असता, तो पहिल्यापासून आमच्यासोबत असून त्याच्या मतदारसंघात सर्वतोपरी ताकद आम्ही देणार असल्याचे गोगावले यांनी म्हटले.

दरम्यान, राजू खरे हे अजित पवार गटाचे तात्कालीन आमदार यशवंत माने यांचा पराभव करून निवडून आले आहेत. आता गोगावले यांनी थेट खरे यांना ताकद देण्याचे वक्तव्य केल्याने अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नवा वाद होणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

सकाळी सकाळी ‘ही’ ड्रिंक करा ट्राय, बद्धकोष्ठता ते पिंपल्सच्या समस्या होतील दूर…

Narendra Modi On Shivjayanti 2025: माझ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाहीय…; शिवजयंतीनिमित्त नरेंद्र मोदींची मराठीतून पोस्ट

महायुतीत कसलेही ‘कोल्ड वॉर’ नाही- एकनाथ शिंदे

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon