देशातील विरोधकांना रोज मला शिव्या दिल्याशिवाय झोप लागत नाही, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. सध्या मोदी तेलंगणा दौऱ्यावर आहेत. यानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदी बोलत होते.
देशातील लोक मला विचारतात की, रोज शिव्या खाऊन तुम्ही थकत नाही का? शिव्या खाण्याची सवय झाली आहे. कारण माझ्या डोक्यात फक्त देशाचा विकास हा एकच विचार सदैव असतो. मोदी यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्यावरही मोठी टीका केली. हताश भीती आणि अंधश्रद्धेतून काही लोक माझ्यावर टीका करत आहेत, असेही ते म्हणाले. दरम्यान ऑनलाईन पेमेंटमुळे देशातील भ्रष्टाचार कमी झाल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले.