राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या एका विधानावर बोलत असतांना राष्ट्रवादी अजून पंधरा वर्षे सत्तेत येणार नाही, असा दावा देसाई यांनी केला.
नुकतेच निंबाळकर यांनी, राज्यात जे राजकारण सुरू आहे, ते असेच सुरू राहिले तर लोकशाही टिकणार नाही, त्यासाठी राष्ट्रवादीने पुढे आले पाहिजे, असे म्हंटले होते. त्यावर देसाई यांनी त्यांच्यावर घणाघात केला. आम्ही लोकशाही मार्गानेच सत्तेत आलो आहे. लोकशाही मार्गाने बहुमत सिद्ध केले आहे, असे प्रत्युत्तर देसाई यांनी दिले.