कोरोना नव्या व्हेरिएंटने जगाची चिंता वाढविली आहे. चीनसह 131 देशांमध्ये कोरोनाचा नवा संस्कार झपाट्याने वाढत आहे. दरम्यान केंद्र सरकारने याबाबत योग्य ती पावले उचलायला सुरुवात केली आहे. सर्वांनी मास्कचा वापर करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
सध्या याबाबत योग्य ती खबरदारी घेतली जात असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे. तसेच महाराष्ट्रात सध्या तरी मास्क सक्तीची गरज नाही, असा निर्वाळा राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिला आहे.
सध्याच्या परिस्थितीत केवळ 132 पॉझिटिव्ह रुग्ण महाराष्ट्रात आहेत. मात्र सुदैवाची बाब म्हणजे महाराष्ट्रात सुमारे 95 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन राज्यात टास्क फोर्स समितीची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन सावंत यांनी केले आहे. तर लहान मुले व ज्येष्ठांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.