पंतप्रधान नरेंद्र मोदींना गुजरातचा कसाई म्हणत पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यानंतर आता पाकिस्तानच्या महिला मंत्र्याने वादग्रस्त वक्तव्य केलंय. पाकिस्तानच्या मंत्रीमंडळातील महिला मंत्री शाजिया मर्री यांनी भारताला अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी दिली आहे.
बिलावल यांच्या समर्थनार्थ मर्री यांनी पत्रकार परिषद घेतली. आमचं न्यूक्लिअर स्टेटस शांत राहण्यासाठी नाही, असं म्हणत त्यांनी थेट भारताला धमकी दिली. भारताविरोधात कोणती तक्रार करत नाही. आमची तक्रार ही भारतामधील मोदी सरकार विरोधात आहे. भारत नेहमी पाकिस्तानवर आरोप करतो. परंतु पाकिस्तान हे गुपचूप सहन करणार नसल्याचं वक्तव्य शाजिया यांनी केलंय.