राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा भाजपला डिवचण्याचे काम केले. भाजप कोरोनापेक्षाही भयंकर आहे. भाजपचा जिवाणू मेंदूत गेला, तर माणूस मेल्यानंतरही बरा होऊ शकत नाही. म्हणून त्यापासून सावध राहा, असे म्हणत मिटकरींनी टीका केली.
मिटकरी म्हणाले, अजित पवारांनी कोरोना असतानाही आमदारांचा विकास निधी ५ कोटी केला. जलसंपदा मंत्री असताना जयंत पाटलांनी नळगंगा-वैनगंगा प्रकल्प दिला. नदीजोड प्रकल्प सुरू करण्याचे त्यांचे स्वप्न होते. मात्र सत्तांतर झाल्यानंतर स्थगिती सरकार सत्तेत आले आणि त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. या सरकारने दिवाळीत आनंदाचा शिधा वाटला. त्याचे काम कंत्राटदाराला दिले. किती लोकांना तो शिधा मिळाला? असा प्रश्न मंत्र्यांना केला.