Saturday, September 21, 2024
Homeindia worldभरधाव कार उलटली, डिव्हायडर ओलांडून बसला धडकली ; नऊ ठार

भरधाव कार उलटली, डिव्हायडर ओलांडून बसला धडकली ; नऊ ठार

देशभरात मोठ्या अपघातांचे सत्र सुरूच असून क्रिकेटपटू ऋषभ पंत याला झालेल्या अपघाताची देशभर चर्चा सुरू असताना गुजरातमध्ये एक दुर्घटना घडली आहे.

गुजरातच्या नवसारी येथे काल रात्री कार व बसच्या धडकेत झालेल्या भीषण अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर २० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग ४८ वरील वेस्मा गावाजवळ हा अपघात झाला.
अपघातग्रस्त बस अहमदाबादेतील एका कार्यक्रमानंतर मुंबईच्या दिशेने येत होती.
तेवढ्यात रस्त्याच्या पलीकडून उलटलेली कार दुभाजक ओलांडून बसच्या समोर आली आणि बसला धडकली. यात कारमधील सर्व ८ जण जागीच ठार झाले, तर बस चालकाने अचानक ब्रेक लावल्याने एका प्रवाशाचा मृत्यू झाला. कारमधील सर्व लोक भरूचमधील एका फार्मा कंपनीचे कर्मचारी आहेत.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments