शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तालुका प्रमुखपदी आनंद बुक्कानुरे यांची निवड करण्यात आली आहे.
पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशान्वये खासदार विनायक राऊत यांनी पत्रकान्वये ही निवड जाहीर केली आहे.
अक्कलकोट शहरप्रमुखपदी मल्लिनाथ खुबा, तालुका संघटकपदी सोपान निकते यांची निवड करण्यात आली. अक्कलकोट तालुक्यातील प्रमुख पदाधिकार्यांनी अलीकडेच आपल्या पदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता नव्याने पक्षबांधणी करण्यात आली आहे. या पक्षाच्या माध्यमातून निष्ठावंत कार्यकर्त्यांची मोट जोडून पुन्हा ऊर्जितावस्था आणू, अशी ग्वाही बुक्कानुरे यांनी दिली.