शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यात मध्यावधी निवडणुका होणार असल्याचे भाकीत वर्तवले आहे. यामुळे राज्यात उलथापालथ होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
ठाकरे गटाच्या विधानसभा संपर्क प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उद्धव बोलत होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले.
दरम्यान काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी देखील मोठं वक्तव्य केलं होतं. आमचं शिर्डीतील अधिवेशन संपल्यावर हे सरकार कोसळेल, असं पाटलांनी म्हटलं होतं. आता ठाकरेंनीही कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिल्याने तर्क वितर्क लावले जात आहेत.