राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे कायम वादात सापडतात. आज पुन्हा एकदा ते चर्चेत आले. कारण कोश्यारी यांनी 26/11च्या हल्ल्यातील शहिदांना चप्पल घालून श्रद्धांजली वाहिली आहे. त्यामुळे कोश्यारी अडचणीत सापडले आहेत.
काँग्रेसने कोश्यारींचा व्हिडीओ ट्विट करत कोश्यारींवर निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी याबाबत ट्विट करत राज्यपालांवर टीका केली. सावंत यांनी राज्यपाल चप्पल घालून शहिदांना श्रद्धांजली वाहत असल्याचा व्हिडीओ ट्विट केला आहे. राज्यपालांच्या या कृतीवर संतापही व्यक्त केला आहे.