निवडणूक आयोगाने अलीकडे अनेक निर्णय घेतले आहेत. आता अंधेरी (पूर्व) या विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घोषित केली आहे. या निवडणुकीकरिता ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे.
या मतदानाच्या दिवशी म्हणजेच ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते संध्याकाळी ६.३० या कालावधीत मतदान कल चाचणी घेण्यास तसेच EXIT POLL चे निकाल प्रिंट तसेच इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांवर किंवा अन्य माध्यमांद्वारे प्रसिद्ध करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे, असे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी कळविले आहे.