Sunday, October 6, 2024
Homemaharashtraब्रेकिंग! पवारांच्या वाढदिनी राष्ट्रवादीला खुशखबर

ब्रेकिंग! पवारांच्या वाढदिनी राष्ट्रवादीला खुशखबर

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयने दाखल केलेल्या भ्रष्टाचार प्रकरणात अखेर जामीन मंजूर झाला आहे. एक लाख रुपयांच्या जातमुलक्यावर हा जामीन मंजूर झाला. मुंबई सत्र न्यायालयाच्या सीबीआय कोर्टाने जामीन नाकारल्यानतर देशमुख यांनी मुंबई हायकोर्टात दाद मागितली होती. 

त्यानुसार देशमुख यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. राखून ठेवलेला निकाल कोर्टाने आज जाहीर केला. कोर्टाच्या निर्णयानुसार देशमुख यांना दिलासा मिळाला आहे. देशमुख यांच्या जामीननंतर नागपूर येथे त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली.
तत्कालीन मुख्यमत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकासाघाडी सरकारमध्ये देशमुख हे राज्याचे गृहमंत्री होते. याच वेळी मुबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गंभीर आरोप केले होते. त्यांनी राज्याच्या महासंचालकांना एक पत्र लिहीले होते. या पत्रात 100 कोटी रुपये वसुली करण्याचे आदेश देशमुख यांनी दिल्याचा आरोप करण्यात आला होता.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments