अलीकडेच ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये भारताची कामगिरी चांगली झाली. मात्र इंग्लंड विरुद्ध खेळण्यात आलेल्या सेमी फायनलमध्ये भारताचा पराभव झाला. परिणामी भारताला या मोठ्या व मानाच्या स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.
भारताच्या या कामगिरीवरून संतापाची लाट उसळली आहे. बीसीसीआयने कारवाईचा बडगा उचलत संपूर्ण निवड समितीच बरखास्त केली आहे. याशिवाय कर्णधार रोहित शर्मावरसुद्धा टीका होत आहे. आता बीसीसीआयकडून पुढील वर्षी खेळल्या जाणाऱ्या t 20 वर्ल्ड कपची तयारी आतापासूनच केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. मिशन वर्ल्डकप 2023 कार्यक्रमानुसार भारतीय संघात अनेक बदल केले जाणार आहेत.
- यानुसार आता विराट कोहली, रोहित शर्मा, मोहमद शमी, दिनेश कार्तिक यांना संघात स्थान दिले जाणार नाही. याची कल्पना सुद्धा संबंधित खेळाडूंना देण्यात आल्याचे समजते. पुढील महिन्यात म्हणजेच जानेवारीत भारत श्रीलंके विरुद्ध 3 t20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी वरीलपैकी एकाही खेळाडूला संघात संधी दिली जाणार नाही. टी ट्वेंटी कर्णधारपदी हार्दिक पांड्याची निवड होणार आहे.