दिल्ली महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर आज गुजरात व हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा अजूनही कायम आहे का हे या निकालातून समोर येणार आहे. गुजरातमध्ये ३३ जिल्ह्यांतील १८२ विधानसभा जागांसाठी १ डिसेंबर आणि ५ डिसेंबर रोजी दोन टप्प्यांत निवडणुका झाल्या. राज्यातील ३७ मतमोजणी केंद्रांवर गुरुवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली.
गुजरातमध्ये भाजप 155 , काँग्रेस 19 आणि आप 10 आघाडीवर. भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू. हिमाचलमध्ये भाजप 32 आणि काँग्रेस 33 आघाडीवर.