संशोधकांचा दावा आहे की मका मांसाहार आणि सप्लिमेंट फूडमधील प्रोटीनची भरपाई करतो. या मक्यातून प्रोटीनसोबत कार्बोहायड्रेड, फायबर आणि व्हिटॅमिन्स देखील मिळतात. मक्याचे हे वाण बायोफोर्टीफायड आहे.
संशोधकांनी आता आधीच्या मक्याच्या तुलनेत २५० टक्के जास्त प्रोटीन असलेल्या मक्याचे वाण शोधले आहे. वाराणसीतील काशी विद्यापीठाच्या संशोधकांनी याला ”मालवीय स्वर्ण मक्का वन” नाव दिले आहे.
देशात शाकाहारी लोकांची संख्या मोठी आहे. शाकाहारामुळे अनेकांच्या भोजनात प्रोटीनचे प्रमाण कमी आढळते. त्याच्यासाठीही हा मका सकस पर्यय ठरणार आहे. यामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण आणि कॅल्शियम वाढवण्यास मदत होणार आहे. त्यासाठी औषध घेण्याची गरज पडणार नाही. डायबेटीस सारख्या समस्या टाळण्यासाठी मक्याचा हा नवा वाण रामबाण ठरणार आहे.
संबंधित बातम्या
मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलणार?ठाकरेंवर निशाणा साधताना फडणवीसांचे मोठे संकेत
किडनी खराब होण्याचे ते 6 संकेत, ज्याकडे सर्वच करतात दुर्लक्ष
Maharashtra Election 2025 Date : राज्यात आचारसंहिता लागू, अखेर निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा
प्रतिक्षा संपणार? आज राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, ऑक्टोबरचे 1500 रुपये कधी मिळणार, आदिती तटकरेंची घोषणा




