मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर काल थरार पाहायला मिळाला. ट्रकचा ब्रेकफेल झाल्याने चालकाने ट्रकबाहेर उडी घेतली. मात्र, हा ट्रक विनाचालक वेगाने धावतच सुटला. सुदैवाने या ट्रकने इतर वाहनांना धडक दिली नाही. परंतु, डिवायडरला धडक देत ट्रक पुढे गेल्याने महामार्गावर थरारसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
सिमेंटरच्या गोळ्या घेऊन एक ट्रक मुंबईच्या दिशेने रवाना होत होता. मात्र, ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने चालकाने अमृतांजन पुलाजवळ गाडीबाहेर उडी घेतली. हा विनाचालक ट्रक रस्त्यावर धावत सुटला. मृतांजन पुलापासून सुमारे 500 मीटर अंतरावर ट्रकने खडकाला धडक दिल्याने ट्रक थांबला आणि मोठा अपघात टळला. दरम्यान, या विनाचालक ट्रकच्या थरारक प्रवासाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.