पुणे जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडलेली आहे. जुन्नर तालुक्यातील नारायणगाव परिसरातील वारूळवाडी येथे एका 22 वर्षीय गर्भवती महिलेचा भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला.
दोन ट्रॉली घेऊन जाणाऱ्या उसाच्या ट्रॅक्टर खाली घेऊन सापडून तिचा मृत्यू झाला. विद्या रमेश कानसकर असे मृत महिलेचे नाव आहे. विद्या ही गर्भवती असून उपचारासाठी रुग्णालयात जात असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबत तिचे पती रमेश यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी चालक गोरक्ष ढेबरे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विद्या उपचारासाठी रुग्णालयात जात असताना रस्त्यात गतिरोधक आल्यानंतर गाडीवरून खाली पडल्या. समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरचा त्यांना धक्का लागला. यामुळे त्या खाली पडल्या आणि त्यांच्या डोक्यावरून ट्रॅक्टरचे चाक गेले. यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मृत महिलेच्या नातेवाईकांनी टाहो फोडला. जग पाहण्याआधीच बाळाने जीव गमावल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.