- इलेक्ट्रिक बाईक उत्पादक Ola Electric ने सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक बाईक Ola S1 Air लाँच केली आहे. ओलाचे सीईओ भावेश अग्रवाल यांनी एका व्हर्च्युअल इव्हेंटद्वारे ही बाईक लॉन्च केली. ही बाईक अनेक उत्तमोत्तम फीचर्सने सुसज्ज आहे.
- तुम्हाला या बाईकमध्ये म्युझिक सिस्टम पाहायला मिळेल. या बाईकमध्ये पार्टी मोड देण्यात आला आहे, ज्याद्वारे तुम्ही कधीही कोठेही तुमच्या फोनशी कनेक्ट करून संगीत आवाजाचा आनंद घेऊ शकता. याशिवाय यामध्ये कॉलिंग मोडही देण्यात आला आहे. त्यासोबतच तुम्हाला यामध्ये ३ रायटींग मोड देखील पाहायला मिळतात.
- या बाईकमध्ये, तुम्हाला २.५ kWh बॅटरी पॅकसह ४.५ किलोवॅटची हब मोटर मिळेल, जी ४.३ सेकंदात ० ते ४० किमी प्रति तासपर्यंत वेग वाढवण्यास सक्षम असेल. ही इलेक्ट्रिक बाईक इको मोडमध्ये १०० किमीची रेंज देईल.