दिवसातून किती कप चहा प्यावा, एक्सपर्ट म्हणतात…

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter
सध्या राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. यामुळे वातावरणात झालेला बदल स्पष्टपणे जाणवत आहे. थंडी वाढल्यामुळे चहा पिण्याचे प्रमाणही वाढले आहे. मात्र दिवसातून किती कप चहा प्यावा, हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. चहा पिणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे तसेच चहाचे विविध प्रकारही आता उपलब्ध होत आहेत.

तुम्ही जर चहाचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास गोष्ट तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. म्हणून तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. चहामध्ये कॅफीन असते जे आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. एक कप चहामध्ये सुमारे 60 मिलिग्रॅम कॅफिन असते.
एका दिवसात तीन कपपेक्षा जास्त चहा पिणे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. समजा तुम्ही दिवसातून चार किंवा त्यापेक्षा जास्त कप चहा पिला तर तुमच्या शरीरातील लोह शोषण्याची क्षमता होईल. याशिवाय चहामध्ये कॉफीनचे  प्रमाण जास्त असल्याने त्याचा मेंदूवर वाईट परिणाम होतो. म्हणून जास्त चहा पिणे केव्हाही वाईटच. अशा प्रकारे जास्त प्रमाणात चहाचे सेवन केल्यास विविध समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. 

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon