दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
25 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
-
राज्य सरकारचे कर्मचारी मालामाल, महागाई भत्त्यात थेट 3 टक्क्यांची वाढ, कर्मचाऱ्यांना मिळणार 7 महिन्यांचा फरक
-
शिंदे सरकारमधील शिवसेना मंत्र्यांच्या OSD ने मला 5 लाख मागितले, आमदार अमोल मिटकरींचा दावा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी OSD आणि स्वीय सहाय्यकांसंदर्भात घेतलेल्या भूमिकेचं केलं कौतुक
-
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी घेतली भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची भेट, दोघांमध्ये एक तास चर्चा
-
रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा दोन दिवसांत सुटेल, मंत्री गिरीश महाजनांनी व्यक्त केला विश्वास
-
मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरून तरुणाची उडी: सुरक्षा जाळीवर अडकल्याने वाचला जीव; वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना पोलिसांची धक्काबुक्की
-
गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्या नात्यात दरी?: लग्नाच्या 37 वर्षांनंतर घटस्फोट घेणार? मराठी अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचीही चर्चा
-
योगेश कदमांनी काढले ‘मातोश्री’चे रेटकार्ड: म्हणाले – राबणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जागी गिफ्ट देणाऱ्याला तिकीट दिले जायचे; नीलम गोऱ्हेंचे समर्थन
-
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 77 दिवस पूर्ण, ग्रामस्थांसह धनंजय देशमुखांचा एल्गार, आजपासून अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात
-
राजकीय हेतूसाठी दुसऱ्यांदा संतोष देशमुखांच्या कुटुंबाचा बळी घेऊ नका, मुख्यमंत्री छक्के पंजे करतायेत, मनोज जरांगेंचा मस्साजोगमध्ये हल्लाबोल
-
इतिहास अभ्यासक आणि संशोधक इंद्रजित सावंतांना धमकी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कोल्हापूरच्या एसपींना फोन, चौकशी करण्याचे आदेश
-
परळी आणि बारामतीत पशुवैद्यक महाविद्यालये होणार, मंत्रीमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे 7 मोठे निर्णय
-
मंत्री धनंजय मुंडे सलग तिसऱ्या कॅबिनेट बैठकीला गैरहजर; पण परळी पशुवैद्यक महाविद्यालय स्थापन करण्यास 564 कोटी रुपये दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
-
पुण्यातील खेडमध्ये अनधिकृत रिसॉर्टवर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची रंगली पार्टी, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शेअर केले व्हिडिओ
-
पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला राजकारणीच जबाबदार, भाजपचे अनेक नेते पबचे पार्टनर, रवींद्र धंगेकरांचा खळबजनक आरोप
-
नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
-
पावसामुळे ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका सामना रद्द: उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी दोन्ही संघांना त्यांचा शेवटचा सामना जिंकावा लागेल
-
इंग्लिश क्रिकेटपटू डॅरेन गॉफ म्हणाला- चॅम्पियन्स ट्रॉफीत संघ वाढले पाहिजेत: 8 ऐवजी 12 संघ असावेत; टीम इंडिया ट्रॉफी जिंकू शकते
इतर महत्वाच्या बातम्या
रात्रीस खेळ चाले! जयंत पाटील मध्यरात्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या बंगल्यावर, तासभर चर्चा
संजय राऊत प्रयागराजला गेले तर गंगा घाण होईल – शहाजीबापू पाटील
संजय राऊत प्रयागराजला गेले तर गंगा घाण होईल – शहाजीबापू पाटील