Saturday, September 21, 2024
Homepolitical...तर दररोज शेकड्यांनी ‘विनयभंग’ होतात

…तर दररोज शेकड्यांनी ‘विनयभंग’ होतात

राष्ट्रवादीचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आज विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक बनले आहेत. या घटनेवरून जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आव्हाड यांच्यावर करण्यात आलेली कारवाई चुकीची आहे. तक्रार करणाऱ्या महिलेचा विशिष्ट हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गर्दीत अंगावर येणाऱ्या व्यक्तीला हा प्रकार विनयभंग होऊ शकत नाही. जर हा गुन्हा होत असेल तर गर्दीत रोज बाजारात, ट्रेनमध्ये व अन्य ठिकाणी शेकडयांनी विनयभंग होत असतील, असेही त्यांनी नमूद  केले. 
दरम्यान आव्हाड यांच्यावर आज विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावरून राज्यातील वातावरण चांगलेच पेटले आहे. केवळ 72 तासात दोन गुन्हे दाखल झाल्याने आव्हाड संतापले आहेत. इतकेच नव्हे तर त्यांनी आपल्या आमदारकीच्या राजीनाम्याची तयारी केली आहे, काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंब्रा येथे ही घटना घडली आहे. याबाबतची तक्रार भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याने नोंदवली आहे. आव्हाड यांनी आपल्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला, असा आरोप संबंधित महिलेने केला आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments