भारत आणि श्रीलंका यांच्यातील आंतरराष्ट्रीय टी 20 सामना जानेवारी महिन्यात खेळवला जाणार आहे. दोन्ही संघात तीन सामन्यांची टी 20 आणि वनडे सीरिज खेळवली जाणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघातील फलंदाज विराट कोहली टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्रेक घेणार असल्याची माहिती बीसीसीआयमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने दिली आहे.
विराटने ब्रेक घेतल्यानंतर त्याच्या जागी राहुल त्रिपाठीला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्रिपाठी अलीकडेच बांगलादेश दौऱ्यावर एकदिवसीय संघात दाखल झाला होता. मात्र, त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले नव्हते.
श्रीलंकेविरुद्धच्या टी 20 मालिकेत विराट दिसणार नाही, हे नक्की झाले आहे. मात्र, वनडे मालिकेतून तो संघात पुनरागमन करणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. पाच जानेवारीला पुण्यातील गहुंजे स्टेडियम येथे हा सामना होणार आहे. या सामन्यासाठीच्या तिकीट विक्रीला कालपासून सुरूवात झाली आहे.