हॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक जेम्स कैमरून यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ सध्या जोरात सुरू आहे. सध्या चित्रपटगृहांमध्ये अवतारचा भाग २ प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. त्यामुळे याचे कलेक्शन झपाट्याने वाढत आहे.
ख्रिसमसच्या निमित्ताने ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ने जगभरात तसेच भारतात रेकॉर्डब्रेक कलेक्शन केले आहे. ‘अवतार 2’च्या कमाईत मोठी वाढ झाली आहे. याचा जगभरातील कलेक्शनचा विचार केला तर प्रसिद्ध व्यापार विश्लेषक रमेश बाला यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर या चित्रपटाच्या जगभरातील कलेक्शनची ताजी माहिती दिली आहे.
रमेशच्या मते ‘अवतार 2’ ने दुसऱ्या वीकेंडला जगभरात $850 दशलक्ष कमावले आहेत. ज्यामध्ये चित्रपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावर $600 दशलक्ष आणि उत्तर अमेरिका बॉक्स ऑफिसवर $250 दशलक्षचा व्यवसाय केला आहे. अशाप्रकारे, भारतीय रुपयाच्या आधारे या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 7000 कोटींहून अधिकची रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.