चार ते पाच प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेले, त्यामुळे राज्य सरकारवर विरोधकांकडून टीका करण्यात आली. पण आज केंद्र सरकारने एक मोठी घोषणा केली आहे.
महाराष्ट्रात दोन हजार कोटींचा प्रकल्प येणार असल्याची मोठी घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या दरम्यान प्रकल्पासंदर्भात त्यांनी माहिती दिली.
महाराष्ट्रातील पुणे येथील रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरची घोषणा त्यांनी केली. सीडॅकचा इलेक्ट्रॉनिक डिझायनिंग प्रकल्प रांजणगावमध्ये येणार आहे. दरम्यान या प्रकल्पाच्या माध्यमातून 2 हजार कोटींची गुंतवणूक आणि 5 हजार रोजगार उपलब्ध होतील, असा दावा केंद्र सरकारकडून करण्यात आला आहे.