सचिन तेंडुलकरने १९९८ साली शारजामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध १३१ चेंडूत १४३ धावांची खेळी केली होती. सचिनची ती इनिंग आजही सर्वांच्या मनात ताजी आहे. या इनिंगनंतर सचिनकडे एका जाहिरातीची ऑफर आली होती. मात्र, त्याने ती जाहिरात करण्यास नकार दिला. त्याच्या नकारामागचे कारण ऐकल्यानंतर चाहत्यांचा मनातला सचिनबाबतच आदर आणखी वाढणार आहे.
त्याने ती जाहिरात शूट करण्यास नकार दिला. कारण त्या जाहिरातीची स्क्रिप्ट खेळ भावनेच्या विरुद्ध होती. याचा खुलासा स्वतः सचिनने अलीकडे केला आहे. सचिन म्हणाला की, ऑस्ट्रेलियाविरूद्धची ती जबरदस्त इनिंग खेळल्यानंतर मी भारतात परतलो.
त्यानंतर मला एका स्पॉन्सरला माझ्यासोबत जाहिरात शूट करायची होती. या जाहिरातीत एक क्रिकेट चेंडू माझ्या दिशेने उडून येतो आणि मी तो स्टेडियमच्या बाहेर भिरकावतो. पण हे ऐकल्यानंतर मी ती जाहिरात नाकारली. मी म्हणालो तुम्हाला त्याची स्क्रिप्ट बदलावी लागेल. कारण हा माझ्या खेळाचा अपमान आहे. मी त्याची पूजा करतो. मला ही जाहिरात जमणार नाही. नंतर त्याची स्क्रिप्ट बदलण्यात आली.