- टी २० वर्ल्ड कपमध्ये आज न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात सामना . यात नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या सलामीच्या जोडीने १० षटकात एकही गडी न गमावता ८१ धावा केल्या. दरम्यान, पॉवरप्लेवेळी न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने एक जबरदस्त झेल टिपला. त्यावेळी विल्यम्सनने दाखवलेल्या खिलाडुवृत्तीचे कौतुक होत आहे.
विल्यम्सनने झेल टिपल्यानंतर पहिली विकेट मिळाल्याचा आनंद न्यूझीलंडचे खेळाडू साजरा करत होते. पण केनच्या लक्षात आलं की, चेंडूचा जमिनीला स्पर्श झालाय. तेव्हा केनने इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरची माफी मागितली. त्याच्या या कृतीने अनेकांची मने जिंकली.