कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या १५० कोटींच्या घोटाळ्याचा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भांडाफोड केला आहे. विधानसभेत गायरान जमिनीबाबत झालेल्या घोटाळ्याचा तपशीलच पवारांनी मांडला. गायरान जमिनीच्या वाटपात सत्तार यांनी पदाचा दुरुपयोग केला. जमिनीचे वाटप करत असताना तत्कालीन महसूल राज्यमंत्री सत्तार यांनी पदाचा दुरुपयोग करून सर्व कायदेशीर बाबींचे उल्लंघन केले.
याबाबत नागपूर खंडपीठाने गंभीर निरीक्षण नोंदवले. राज्यमंत्र्यांविरोधात प्रथमदर्शनी सबळ पुरावेही उपलब्ध आहेत. जिल्हा कोर्टाचा आदेश माहिती असतानाही महसूल राज्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला, असा आरोप पवारांनी केला. आरोप करताना त्यांनी आता राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. या मुद्द्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत सत्तारांविरोधात घोषणाबाजी केली.