Warning: Trying to access array offset on value of type bool in /home/u727490581/domains/solapurviralnews.com/public_html/wp-content/plugins/pro-elements/modules/dynamic-tags/tags/post-featured-image.php on line 39

किंग कोहली पुन्हा शिखरावर! कॅप्टन्सी हिसकावली, प्रचंड टीका झाली पण...

किंग कोहली पुन्हा शिखरावर! कॅप्टन्सी हिसकावली, प्रचंड टीका झाली पण…

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Warning: Trying to access array offset on value of type bool in /home/u727490581/domains/solapurviralnews.com/public_html/wp-content/plugins/pro-elements/modules/dynamic-tags/tags/post-featured-image.php on line 39
विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध ५३ चेंडूत नाबाद ८२ धावांची मॅचविनिंग खेळी खेळली. त्याच्या खेळीमुळे भारतीय संघ शेवटच्या चेंडूवर सामना जिंकू शकला. काही महिन्यांपूर्वी काही क्रिकेट पंडित विराटला टी-२० वर्ल्डकप संघात घेऊ नये, असे म्हणत होते. ते सर्व आज विराटचे गोडवे गात आहेत.
गेली २ ते ३ वर्षे विराटसाठी खूप कठीण होती. या काळात त्याच्यावर भरपूर टीका झाली. पण तो संयमाने आणि मजबूतीने उभा राहिला. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून त्याने टीकाकारांना चोख उत्तर दिले आहे. नाही. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये विराट कोहलीने भारताच्या T20 संघाचे कर्णधारपद सोडले होते. २०२१ च्या टी२० विश्वचषकापूर्वी विराटचा हा निर्णय धक्कादायक होता.
वर्कलोडचं कारण देत त्यानं कर्णधारपद सोडलं. त्यावेळी तो खराब फॉर्मशी झगडत होता.
पण अशा वेळीदेखील त्याच्या नेतृत्वात संघ एकही ICC ट्रॉफी जिंकू शकला नाही, याचं दडपण त्याच्यावर अधिक होतं. त्यानंतर खरी लढाई सुरू झाली. टी-20 संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर विराटवर एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोडण्याचाही दबाव होता.
बीसीसीआयला मर्यादित षटकांच्या दोन्ही फॉरमॅटमध्ये एकच कर्णधार हवा होता. बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष सौरव गांगुली आणि विराट यांच्यातही याबाबत मतभेद निर्माण झाले होते.
विराट आणि रोहित शर्मा यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्याही आल्या. शेवटी डिसेंबर २०२१ मध्ये विराटचे एकदिवसीय कर्णधारपद काढून घेण्यात आले.
टीम इंडियातील फूट आणि विराट आणि बीसीसीआयमधील मतभेदांचा परिणाम टीम इंडियावरही झाला. यामुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघाने कसोटी आणि एकदिवसीय मालिका गमावली. या दौऱ्यात आणखी एक मोठी घटना घडली.
विराटने अचानक कसोटी संघाच्या कर्णधारपदावरूनही पायउतार होण्याची घोषणा केली. ४ महिन्यांतच कोहलीच्या हातून तिन्ही फॉरमॅटचे कर्णधारपद गेले.
विराटच्या डोक्यावरुन कर्णधारपदाचा भार गेला होता. फलंदाजीत तो सातत्याने अपयशी ठरत होता. त्याची बॅट कसोटी, एकदिवसीय किंवा टी-२० मध्ये धावा करू शकली नाही.
अशा परिस्थितीत विराट भारतीय क्रिकेट चाहत्यांपासून ते माजी क्रिकेटपटूंच्या निशाण्यावर आला.
या काळात विराटला सतत ब्रेक दिला जात होता. त्यामुळे देखील माजी क्रिकेटपटू आणि चाहते विराटवर संतापलेले दिसले.
विराटला टी-२० वर्ल्डकप संघात स्थान दिले जावू नये, असेही अनेक दिग्गजांनी म्हटले. विराटने शतक झळकावूनही एक हजाराहून अधिक दिवस उलटले होते. २०२० ते २०२२ या काळात त्याने कसोटीत केवळ ८७२ धावा केल्या.
या कालावधीत एकदिवसीय क्रिकेटमध्ये केवळ ७३५ धावा करता आल्या. तर T20 मध्येही तो काही विशेष करु शकला नाही. आयपीएलमध्येही तो फ्लॉप झाला होता. या वर्षी जून-जुलैमध्ये झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही तो सपशेल अयशस्वी ठरला. त्यानंतर विराटची कारकीर्द संपणार असल्याचे बोलले जात होते. टी-20 विश्वचषकातही त्याच्या निवडीच्या शक्यतांबाबत संशयाचे ढग दाटून आले होते. 
तीन वर्षांत एवढी खराब कामगिरी करूनही तो संघात कायम आहे, ही मोठी बाब असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. त्यानंतर आशिया कप २०२२ आला आणि इथून स्टोरी पूर्णपणे बदलली.
आशिया चषक २०२२ च्या पहिल्या सामन्यात त्याने पाकिस्तानविरुद्ध संथ पण समंजस खेळी खेळली. यानंतर त्याला हाँगकाँगविरुद्ध अर्धशतक झळकावण्यात यश आले. या दोन्ही सामन्यांनी त्याला आत्मविश्वास दिला आणि पुढच्या सामन्यात त्याने पाकिस्तानविरुद्ध ४४ चेंडूत ६० धावा ठोकल्या. पाकिस्तान विरुद्धच्या या खेळीनंतर विराट लयीत आल्याचे दिसत होते आणि त्यानंतर त्याने आशिया चषक २०२२ च्या शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तान विरुद्ध ६१ चेंडूत १२२ धावांची धमाकेदार खेळी खेळली आणि आपल्या ७१ व्या शतकाचा दुष्काळ संपवला. आशिया कप २०२२ मध्ये विराट टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.
आशिया चषकापासून विराटने सातत्याने मोठ्या खेळी खेळल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेतही त्याने अर्धशतक झळकावले होते आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धही ४९ धावा केल्या होत्या. आता पाकिस्तानविरुद्ध ५३ चेंडूत ८२ धावांची स्फोटक खेळी खेळत त्याने टीम इंडियाला अशक्य वाटणारा विजय मिळवून दिला. विराटच्या या अप्रतिम खेळीने तो पुन्हा एकदा रणांगणात उतरल्याचे सिद्ध झाले आहे. 
मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon