2016 रोजी मोदी सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतला. या वर टीका करण्यात आली. सध्या दोन हजाराच्या नोटा चलनात नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाले आहे. इतकेच नव्हे तर एटीएम मधून सुद्धा 2000 नोटा निघत नाहीत. दोन हजाराच्या नोटा बंद पडल्याच्या अफवा सध्या पसरत आहेत. तसेच एक जानेवारीपासून एक हजाराच्या नोटा चलनात येतील अशीही शक्यता आहे.
दरम्यान याचा एक व्हिडिओ जबरदस्त वायरल होत आहे. एक जानेवारीपासून एक हजाराची नोट पुन्हा चलनात आहे, असा दावा या व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे.तसेच दोन हजाराची नोट बँका माघारी घेतील, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. मात्र व्हायरल झालेला हा व्हिडिओ फेक असल्याचे समोर येत आहेत. एक हजाराची नोट नव्याने बाजारात येण्याची कुठलीही शक्यता नाही. त्यामुळे अशा फेक न्युजवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन सरकारने केले आहे.
संबंधित बातम्या
आता प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडी दिली जाईल; तानाजी सावंत यांचा भाजपवर घणाघात
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
भाजप-शिंदे गटाची अजस्त्र प्रचारयंत्रणा निष्प्रभ करायला उद्धव ठाकरेंनी 40 मोहरे निवडले, स्टार प्रचारकांच्या यादीत कोण-कोण?
तुम्ही तोपर्यंत काँग्रेसमध्येच थांबा आणि सेटिंग करून भाजपचे..खासदार प्रणिती शिंदेंवर बड्या नेत्याचा गंभीर आरोप
सांगोला येथे 3 फेब्रुवारी रोजी सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन




