काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. शिंदे हे आपल्या पदाचा राजीनामा देणार नाहीत. कारण ते भ्रष्टाचार करून मुख्यमंत्री झाले आहेत, असा गंभीर आरोप पटोले यांनी केला.
पटोलेंनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल भाजपचे लोकं वादग्रस्त विधानं करत आहेत. महाराजांच्या विचारांनी प्रेरित असलेले आणि भाजपला पाठिंबा देणारे खासदार, आमदार यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. यामध्ये मुख्यमंत्री शिंदे हे सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा देणार नाहीत, कारण ते भ्रष्टाचार करून मुख्यमंत्री झाले आहेत, असं पटोले म्हणाले.